एका वाक्यात उत्तरे लिहा
1) लोकसभेवर कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडून पाठविले जातात?
योग्य उत्तर: लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठविले जातात.
2)राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात
योग्य उत्तर: राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात.
3) दरवर्षी कोणत्या महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात?
योग्य उत्तर: दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात
4) पैशाविषयी ची सर्व विधेयक कोणत्या सभाग्रहात मांडली जातात?
योग्य उत्तर: पैसा विषयीची सर्व विधेयक लोकसभा सभागृहात मांडली जातात
5) भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केली आहे?
योग्य उत्तर: भारताचे संस्थेची निर्मिती संविधानाने केली आहे.
6) महाराष्ट्रात लोकसभेला किती जागा आहेत?
योग्य उत्तर: महाराष्ट्रात लोकसभेला 48 जागा आहेत.
7) संसदेचे पहिले सभागृह कोणते?
योग्य उत्तर: संस्थेचे पहिले सभागृहे लोकसभा आहेत.
8) मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत. अशावेळी घेतलेल्या निवडणुकांना कोणत्या निवडणुका म्हणतात?
योग्य उत्तर:मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात.
9) लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती असतात?
योग्य उत्तर: लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 इतकी असतात
10) अँग्लो-इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या किती प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेला करू शकतात?
योग्य उत्तर: अँग्लो-इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेला करू शकतात
No comments:
Post a Comment